#MarathaReservation सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी, प्रत्यक्ष सुनावणीची मागणी मान्य होणार?
Continues below advertisement
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअलऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची मागणी सर्व पक्षकारांच्यावतीनं करण्यात आली होती. मात्र, आज देखील ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. सुनावणीला सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुरुवात होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maratha Aarakshan Narendra Patil Sambhajiraje New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Udayanraje Maratha Reservation