#DhananjayMunde | धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी - सुधीर मुनगंटीवार
मुंबई : बलात्काराचा आरोप व विवाहबाह्य संबंधाची स्वतःच दिलेली कबुली, यामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी मुंडे यांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे संकेत राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याने आज दिले आहेत.