ST Workers | एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर आक्रोश, कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग
Continues below advertisement
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना लगेच एका महिन्याचं वेतन देणार, सणासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम तात्काळ देणार आहोत, अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, अजून एका पगाराची व्यवस्था दिवाळी आधी करण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही त्यांच्या वेतनासाठी बॅंकेकडे कर्ज देखील मागितले आहे, असं परब यांनी सांगितलं. आज एका तासात कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन मिळेल, त्यामुळं त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये, असं आवाहन परब यांनी केलं.
Continues below advertisement