Covid Vaccine | केंद्राने गरिबांना मोफत लस न दिल्यास राज्य मोफत लस देण्याचा प्रयत्न करणार-राजेश टोपे
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात आली. आज प्रत्यक्षात लस जरी रुग्णांना देण्यात आली नसली तरी त्या संदर्भाने सगळी प्रक्रिया पडताळून पाहण्यात आली. ही लस गरिबांना मोफत मिळावी यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.