WEB EXCLUSIVE | मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात सरकारने प्रयत्न कमी आहेत - संभाजीराजे छत्रपती
मराठा समाजाचे आरक्षण टिकावण्यात सरकारने प्रयत्न कमी आहेत, फार प्रयत्न सरकारकडून होताना दिसत नाहीत असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय, सोबतच सरकारमध्ये समन्वय नाही, मराठा आणि ओबीसी समाजात जान्वपुर्वक दुही निर्माण केली जात आहे असंही ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणातून आरक्षण नको आहे, सारथी संस्था टिकू नये असे प्रयत्न सरकार मधले घटक करत आहेत, आणि खुद्द अजित पवार असूनही सारथी संस्था सुरू झाली नाही असं ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे विचारवंत असून त्यांनी माझा अवमान केला नाही, पण त्यांनी योग्य शब्द वापरले नाहीत असं संभाजीराजे म्हणाले.
Tags :
Maratha Aarakshan Narendra Patil Sambhajiraje New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Udayanraje Maratha Reservation