कोरोनाविरोधातील लढाईत राज्य सरकार अपयशी,कोरोना काळातला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा - देवेंद्र फडणवीस

उद्यापासून विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन सुरु होतंय, त्यापार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. कोरोना, मराठा आरक्षण, वाढीव वीजबिल आणि मेट्रो कारशेडची जागा कांजूरला स्थलांतरित करण्याच्या निर्णयावरुन सरकारला चांगलच धारेवर धरलं. सरकारच्या अयोग्य भूमिकेमुळेच  मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाली  असा आरोप फडणवीसांनी केलाय. वाढीव वीज बिलांबाबत सराकारनं केलेल्या घूमजावरुन जाब विचारणार असल्याचा इशारा य़ावेळी फडणवीसांनी दिलाय. मेट्रो कारशेडचं काम हे फक्त आणि फक्त अहंकारातून कांजूरमार्गला हलवण्यात आल्याचा आरोप करत मेट्रो प्रकल्प चार वर्ष रखडणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. तसेच महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोपही यावेळी फडणवीसांनी केलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola