राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेल्यांना दिलासा, एसटीद्वारे मोफत घरी पोहोचवणार सरकार

Continues below advertisement
मुंबई : राज्यात अडकलेल्यांना एसटीद्वारे त्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहे. यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च  देखील सरकार करणार असल्याचे  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. 10 हजार एसटी बसेसने राज्यात अडकलेल्या लोकांना घरी पोहोचवणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितलं. या प्रवासाचा खर्च मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे. यासाठी जवळपास 20 कोटी रुपयांच्या वर अपेक्षित खर्च आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरु होईल, असं देखील वडेट्टीवार यांनी सांगितलं. पुढच्या दोन दिवसात राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत एसटीद्वारे सोडलं जाईल, असं वडेट्टीवार म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram