SSC Exam Cancelled | दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीचीही परीक्षा होणार नाही

Continues below advertisement
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. त्याशिवाय नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दल एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिलीय. राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील परिक्षांबद्दलही उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही संबंधीत विद्यापीठातील कुलगुरू आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram