Yogi Adityanath Sabha Solapur : आज सोलापुरात योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYogi Adityanath Sabha Solapur : आज सोलापुरात योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा सांगलीचे भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भव्य जाहीर सभा आज सांगलीमध्ये होत आहे. सायंकाळी 5 वाजता सांगली मिरज रोडवरील चिंतामण कॉलेजच्या ग्राउंडवर योगी आदित्यनाथ यांची भव्य अशी जाहीर प्रचार सभा होणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या जाहीर प्रचार सभेच्या पार्श्वभूमीवर चिंतामण कॉलेजवर सभेची जय्यत तयारी केली जात आहे. चिंतामण कॉलेजच्या ग्राउंड होण्यासाठी भव्य असा स्टेज उभारण्यात आला असून समोर हजारो खुर्च्या या कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मांडण्यात आले आहेत. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात येत आहे. सायंकाळी पाच वाजता चिंतामण कॉलेजच्या ग्राउंडवर योगी आदित्यनाथ यांचे आगमन होऊन त्या ठिकाणी ते सर्वांना जाहीर सभेच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.