Solapur : उजनीतून सोलापूरसाठी सोडलेल्या पाण्याचा वेग मंदावला, 35 किलोमीटरसाठी लागले 43 तास
सोलापूर , पंढरपूर , सांगोला , मंगळवेढा शहरांसाठी उजनीतून दोन दिवसापूर्वी सोडलेल्या पाण्याचा वेग मंदावलाय. आज सकाळी १० वाजता धरणापासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संगम येथे पोहोचायला पाण्याला 41 तासांचा वेळ लागला. मंगळवारी उजनी धरणातून 5 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे औज बंधाऱ्यात पाणी पोचायला तब्बल १० दिवसांचा वेळ लागेल. त्यामुळे सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार हेही पहाणं महत्वाचं असणार आहे. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहुयात.