Vidya Lolge:Sambhaji Bhide गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये,अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू

सोलापूर : संभाजी भिडे गुरूजींनी (Sambhaji Bhide Guruji) वटसावित्रीच्या पुजेवेळच्या महिलांच्या पेहरावावरून केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. त्यातच आता सोलापुरातल्या महिला संघटनेने त्यांना इशारा दिला आहे. संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू असा इशारा सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वूमन्स (WOW) या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिला आहे. 

वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, त्या ठिकाणी फक्त साडी घातलेल्या महिलांनी जावं अशा प्रकारचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यावरून सोलापुरातील महिला संघटना आक्रमक झाली आहे.  

संभाजी भिडेंच्या धोतरावर बोलावं लागेल

संभाजी भिडे यांना इशारा देताना विद्या लोलगे म्हणाल्या की, भिडे गुरुजी यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये, हे आता जास्त होत असून आता ऐकवलं जातं नाही. आम्ही काय करायचं आणि काय करू नये हे सांगणारे भिडे गुरुजी हे कोण आहेत? ते आमचं घर चालवत नाहीत. यापुढे त्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्यांचे पेहराव असणाऱ्या धोतरावर आम्ही बोलू शकतो. त्यांनी वाढवलेल्या मिशाही आम्हाला कापाव्या लागतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola