Tuljapur Temple Notice : मंदिरात कपड्यांबाबत निर्बंधांचा निर्णय प्रशासनाकडून अवघ्या 8 तासांत मागे
Continues below advertisement
महाराष्ट्राचं आराध्यदैवत तुळजाभवानीच्या मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनानं अवघ्या आठ तासांत मागे घेण्यात आला आहे. मंदिर परिसरात लावण्यात आलेले फलक आता काढून टाकण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा, असा सल्ला या फलकांवर देण्यात आला होता. त्यामुळं भाविकांचा झालेला संताप एबीपी माझानं दाखवला आणि अवघ्या आठ तासात मंदिर प्रशासनानं निर्णय बदललाय. माझाच्या बातमीनंतर तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतेही निर्बंध नसतील, असं लेखी स्पष्टीकरण तहसीलदार सौदागर तांदळेंनी दिलं आहे.
Continues below advertisement
Tags :
BAN Temple Decision Explanation Tuljabhavani Indian Culture 'Maharashtra Plaque Aradhyadaivat Tokade Clothes Civilization Consciousness Tehsildar Saudagar Tandale