Truck Driver Strike: ट्रक चालकांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका, बळीराजा चिंतेत ABP MAJHA
Continues below advertisement
निर्यातबंदी आणि वाहन चालकांचा संप अशा दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी अडकले आहेत. शासनाने निर्यातबंदी आणि वाहन चालकांच्या संपावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. आज बाजारात कांदा आणला आहे, पण उद्या संप सुरु राहिला तर कांदा बाजारात आणायचा कसा? असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारला आहे.
Continues below advertisement