Solapur Railway : सिमेंट वाहून नेणाऱ्या मालगाडीचं इंजिन थेट शेतात शिरलं ABP Majha
सिमेंट वाहून नेणाऱ्या मालगाडीचे इंजिन थेट शेतात शिरल्याची घटना घडलीय. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केमजवळ हा रेल्वे अपघात घडलाय.. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडलाय... सिमेंट घेऊन जाणाऱ्या या मालवाहतूक गाडीचे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले... त्यानंतर मालगाडीचं इंजिन थेट शेतात जाऊन थांबलं.... सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मालगाडी रुळावरुन घसरण्याचं कारण चौकशीनंतर समोर येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीय...