Tembhurni ABP Majha Impact : टेंभुर्णीत विठ्ठलराव शिंदे कारखान्यानं उसतोड मजुरांती दिवाळी केली गोड

Continues below advertisement

दिवाळीत शेतकरी आणि शेतमजुरांची आठवण ठेवा असं आवाहन एबीपी माझानं केल्यानंतर टेंभुर्णीतील विठ्ठलराव शिंदे कारखान्यानं 50 हजार ऊसतोडणी कामगारांची दिवाळी गोड केली. परतीच्या पावसानं एकीकडे ऊस उत्पादक अडचणीत आलेत. अनेक ठिकाणी ऊसाच्या मळ्यात पाणी असल्यानं शेकडो मजुरांना दिवाळी सणात कामाशिवाय बसून राहण्याची वेळ आलीय. देशात सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या टेंभुर्णीतील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यानं 70 लाख रुपये खर्च करून ऊसतोडणी कामगारांना मदत केलीय. कामगारांच्या झोपडीत जाऊन 5 किलो बुंदी आणि 5 किलो चिवडा असं फराळाचं वाटप केलं. त्यामुळे ५० हजार ऊस तोड कामगारांची दिवाळी गोड झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram