Solapur BRS : दक्षिण सोलापुरातून 52 माजी सरपंच, उपसरपंचांचा बीआरएसमध्ये प्रवेश : ABP Majha
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सोमवारी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यामध्ये 52 ग्रामीण पुढाऱ्यांचा समावेश असल्याचा दावा बीआरएसचे नेते सचिन सोनटक्के यांनी केला आहे.
हैद्राबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोेहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील 60 वाहनांचा ताफा हैद्राबादला गेला होता. BRS च्या वाढत्या प्रभावमुळे भाजप आमदार सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांची डोकेदुःखी वाढण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.