Solapur Unseasonal Rain : सोलापुरात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात विजपुरवठा खंडित
Solapur Unseasonal Rain : सोलापुरात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात विजपुरवठा खंडित
काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूरला अक्षरशः झोडपलंय... सोलापूर शहरासह अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा तालुक्यात जोरदार पाऊस झाला... वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली... शहरात 20 ठिकाणी विजेचे खांब पडलेत तर जवळपास 70 ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत. त्यामुळे सोलापुरातल्या अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता.. ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय... आंबा, केळी, पपई, डाळिंबासारख्या फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे.