Solapur : सोलापुरात शिपायाची शेततळ्यात उडी, 14 तासांनंतर कुटुंबीयांचं आंदोलन मागे
Continues below advertisement
हनुमंत काळे 2011 साली शिपाई म्हणून आमच्या शाळेत रुजू झाले. शिक्षणाधिकाऱ्यांकडून रीतसर मान्यता घेतली. त्यानंतर शालार्थ आयडीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत उपसंचालक यांच्याकडे 2018 मध्ये प्रस्ताव पाठवला. तेव्हापासून आतापर्यंत शालर्थ आयडी मिळालेला नाही. 2020 मध्ये या संदर्भात एक ड्राफ्ट मिळाला होता. त्यामध्ये देखील त्रुटी होत्या ज्या आम्ही कळवल्या. पगारसाठी ऑनलाईन कार्यवाही झालीच नाही. जर आमच्याकडून काही त्रुटी होत्या तर ज्यावेळी शिपाई, त्यांचे पालक, आमचे शिक्षक विचारण्यासाठी जात होते तेव्हा कोणतीही माहिती उपसंचालक कार्यालयकडून दिली नाही. आमच्या बाजूने कोणतीही त्रुटी आम्ही ठेवल्या नाहीत.
Continues below advertisement