Solapur Onion Price Drop : सोलापुरात कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरले | ABP Majha

Solapur Onion Price Drop : सोलापुरात कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरले | ABP Majha

सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक, आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले, चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार 500 ते 3 हजार रुपयांचा दर. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक, आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले.  सोलापुरात आज जवळपास साडेपाचशे गाड्या कांद्याची आवक. चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 2500 ते 3000 रुपये दर तर सर्वसाधारण कांद्याला 1500 ते 2000 रुपये प्रमाणे मिळतोय भाव. मागील महिन्याभरात कांद्याचे दर निम्म्याहून घसरले, मागील महिन्यात कांद्याला जवळपास पाच ते सात हजार रुपये होता भाव. एका आठवड्यात जवळपास 3 हजार गाडी कांद्याची आवक सोलापूरच्या बाजारात झाली आहे, त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola