Solapur Kurduwadi : सोलापुरातील कर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली
Solapur Kurduwadi : सोलापुरातील कर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली
यांची गाडी मराठा आंदोलकांनी (Maratha Andolak) रोखली. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार यांच्या गाडीच्या (Sharad Pawar Car) समोर येऊन काही मराठा आंदोलक (Maratha Reservation Protest) घोषणा देत होते. शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. या वेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली होती.
शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली आहे. शरद पवार यांची गाडी कुर्डूवाडी जवळ अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. सकाळी 11 वाजता बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा तसेच नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत पवार हे बार्शीत आहेत. संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्याला ही उपस्थित राहतील.
काय म्हणाले शरद पवार?
मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली होती. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर पवारांनी यावेळी माझा पाठींबा आहे, असे म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या.