Solapur : कर्माळा तालुक्यात मालगाडी रुळावरुन घसरुन थेट शेतात : Karmala Train Derailed

सिमेंट वाहून नेणाऱ्या मालगाडीचे इंजिन थेट शेतात शिरल्याची घटना घडलीय. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केमजवळ हा रेल्वे अपघात घडलाय. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीला पहाटे ३ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडलाय. सिमेंट घेऊन जाणाऱ्या या मालवाहतूक गाडीचे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले. त्यानंतर मालगाडीचं इंजिन थेट शेतात जाऊन थांबलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मालगाडी रुळावरुन घसरण्याचं कारण चौकशीनंतर समोर येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola