Solapur Karmala Crime : पुण्याच्या वानवडीतील ठाकरे गटाच्या कार्यालयावर गोळीबार
सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबा गावात एका दुकानदाराला चौघांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झालाय. इस्त्री करायला आलेल्या चार जणांना दुकानदाराने आपली थकीत उधारी मागितल्यानं या चौघांनी दुकानदाराला लोखंडी गजाने मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान याप्रकरणी कृष्णा सोनटक्के यांनी पोलिसांत या चौघांविरोधात तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल करुन यांना अटक केल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.