Solapur IT Raids : सोलापुरात बीफ एक्सपोर्ट कंपनी, भंगार, स्टील व्यावसायिकांवर आयकरचे छापे

Solapur IT Raids : सोलापुरात बीफ एक्सपोर्ट कंपनी, भंगार, स्टील व्यावसायिकांवर आयकरचे छापे


सोलापूरात आयकर विभागाचे विविध व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापे बीफ एक्सपोर्ट कंपनी, बांधकाम साहित्य आणि भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने छापे मारले सोलापुरातील आसरा चौक, कुमठा नाका, हैदराबाद रोड परिसरामध्ये हे छापे. या छाप्यांमध्ये जवळपास 50 कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. सोमवार ते गुरुवार या कालावधीमध्ये आयकर विभागाने हे छापे टाकल्याची माहिती. यामध्ये विशेषता भंगार विक्रेत्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याची माहिती. भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेल्या व्यवहार आणि कागदोपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आढळून आल्याची प्राथमिक माहिती. भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आल. तसेच हैद्राबाद रोड येथील कत्तलखाना चालवणाऱ्या एका कंपनीवर ही छापे टाकण्यात आले आहेत. या कंपनीच्या मुंबई, कोल्हापूरसह विविध कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले असून तिथून कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola