
Solapur : माजी मंत्र्याच्या बंगल्यासमोर फेकली फटाके, बार्शीत पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल
Continues below advertisement
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात तरुणांच्या एका टोळक्याने चक्क माजी मंत्र्यांच्या बंगल्यात फटाके फेकल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच तरुणांच्या विरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानामोर 23 ऑक्टोबरला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही तरुण फटाके फोडत होते. रात्री बंगल्याच्या गेटसमोर फटाके फोडण्याचा आवाज आल्याने दिलीप सोपल यांच्यासह घरातील सर्वजण जागे झाले. यावेळी त्यांनी तातडीने सीसीटीव्ही फूटेज पाहताना पाच जण गेटसमोर फटाके फोडत होते..त्यातील एकाने आदली फटकासारखा स्फोटक बंगल्याच्या दिशेने तोंड करून पेटवला.. तर एकाने फटाका पेटवून चक्क बंगल्याच्या कंपाउंडमध्ये फेकला. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे..
Continues below advertisement