Solapur : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti निमित्त सोलापुरात शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने सोलापुरात शिवजन्मोत्सव साजरा केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाल शिवबाचा पाळणा सोहळा पार पडतोय. जिल्ह्यातील वीर माता, वीर पत्नीच्या हस्ते हा पाळणा सोहळा पार पडतो. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी माँसाहेब जिजाऊंच्या वंशज संगीताराजे जाधवर, तानाजी मालूसरे यांच्या वंशज शीतलताई मालुसरे, रायबा मालुसरे हे देखील ह्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी ह्या अभूतपूर्व पाळणा सोहळ्याला सोलापुरातील हजारो महिला उपस्थित राहतात. आणि छत्रपती शिवारायांचा हा जन्मोत्सव साजरा करतात. रात्री बरोबर 12 वाजता हा पाळणा सोहळा संपन्न होईल.