Solapur Chemical Company Fire | सोलापूर MIDC मधील Chemical कंपनीला भीषण आग, स्फोटांचे आवाज
Continues below advertisement
सोलापूरमधील चिंचोली MIDC मध्ये एलनजी तुळज असोसिएट्स या Chemical कंपनीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळच्या सुमारास लागलेली ही आग दोन तासांहून अधिक काळ धुमसत आहे. आगीमुळे परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही, अशी माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Chemical कंपनी असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहेत. पोलिसांकडून घटनास्थळी सिक्युरिटी कव्हर आणि अॅक्सेस कंट्रोलची व्यवस्था करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीचे मोठे लोट आणि धुराचे साम्राज्य दूरवरून दिसत आहे. खबरदारी म्हणून आजूबाजूचे कारखाने खाली करण्यात आले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement