Solpaur : दक्षिण सोलापूरच्या सीना नदी आणि कुरुल कॅनलमध्ये पाणी सोडण्यासाठी आंदोलन
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी आणि कुरुल कॅनलमध्ये पाणी सोडण्यात यावं यासाठी आज सोलापुरात आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात होणारेय. भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे. सीना नदीत पाणी नसल्याने शेतीचे आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय. त्यामुळे उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने धरणातून सीना नदी आणि कुरुल कॅनलमध्ये टेल एन्ड पर्यंत पाणी सोडावं अशी मागणी भाजपा आमदार सुभाष देशमुख यांची आहे.