Solapur Akkalkot : 106 व्या वर्षी दात आल्याचं समजून आजीबाईंचा कौतुक सोहळा

Continues below advertisement

अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे एक अनोखा कार्यक्रम पाहायला मिळाला.106 वर्षांच्या आजीबाईंना कुटुंबीयांनी पाळण्यात ठेवून त्यांचं नामकरण केलं. १०६ व्या वर्षी त्यांच्या जबड्यात दात दिसू लागल्याने, पुन्हा दुधाचे दात आल्याचं समजून त्यांनी हा कौतुक सोहळा साजरा केलाय. धानव्वा उडगे यांच्या कौतुकाच्या सोहळ्याची मोठी चर्चा रंगलीय. दरम्यान, या वयात दुधाचे दात परत येणे अशक्य असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. एखाद्या व्यक्तीचे दात पडल्यानंतर दाताचा काही भाग हा हिरड्या खाली लपून राहतो. वय झाल्यानंतर जबड्याच्या हाडांची झीज होते. आणि हिरड्याखाली असलेले दात पुन्हा दिसू शकतात. असं तज्ज्ञांनी सांगितलंय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram