Shakambhari Purnima 2023: शाकंबरी पौणिमेपूर्वी मातेला दाखविण्यात आला 60 भाज्यांचा महाभोग

Continues below advertisement

पंढरपूर:  शाकंबरी पौर्णिमा (Shakambhari Purnima) हिंदू धर्मातील तसा नेहमीच एक सण मात्र ज्या घरात हा सण साजरा होतो त्या घरातील महिलांना या दोन दिवसात अनेक दिव्यातून जावे लागते. शाकंबरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्याची देवी मानली  जाते. आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या पाने , फुले , फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते. या देवीची पौर्णिमाही याच पद्धतीने खास असते. या हंगामात पिकणाऱ्या किमान 60 प्रकारच्या भाज्याचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे. हा भोग देखील सूर्योदयापूर्वी म्हणजे माशी उठण्यापूर्वी देवीला दाखवावा लागतो.  

यासाठी आदल्या दिवशी या 60 प्रकारच्या फळ व पालेभाज्या गोळा करताना माणूस दमून जातो . मेथी , पालक , शेपू , तांदूळसा , भेंडी , गवार , कारले , वांगे , बटाटा , कोबी , फ्लॉवर अशा ठराविक भाज्या आपणास माहित असतात.  मात्र अगदी सराटी , घोळ , चिघळ , कुर्डू , केळफूल , कडवंची , हदगाचिंचेचा चिगोरफूल , चंद्र नवखा , देवडांगरं अशा किती तरी प्रकारच्या रानभाज्या मंडईमधून आणाव्या लागतात. खरी कमाल या भाज्या विकणाऱ्याची असते. कारण हा भाजीवाला पठ्ठया 60 लागतात तर 88 प्रकारच्या भाज्या आणून ठेवतो.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram