Shahaji Bapu Patil Pandharpur : झाडी, डोंगर हाय, रस्ता नाय; शहाजी बापूंच्या मतदार संघातली दुरावस्था

Continues below advertisement

Shahaji Bapu Patil Pandharpur : झाडी, डोंगर हाय, रस्ता नाय; शहाजी बापूंच्या मतदार संघातली दुरावस्था

पूर्वी सांगोला तालुका भाई गणपतराव देशमुख यांच्या नावाने ओळखला जायचा आता  काय झाडी काय डोंगर मुळे आमदार शहाजीबापू यांच्या नावाने सांगोला ओळखला जाऊ लागला आहे . पण याच सांगोला तालुक्यातील एका गावाने बापुना इथेही झाडी  हाय डोंगार हाय पण रास्ता नसल्याने काहीच ओके नसल्याचे सांगितलंय . शहाजीबापू यांनी गुवाहाटी येथे केलेल्या या वक्तव्यावर त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली पण आता त्यांच्याच मतदारसंघातील मतदार त्यांचाच डायलॉग त्यांनाच ऐकवून प्रश्नाकडे लक्ष वेधू लागले आहेत .  सांगोला तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे  तिपेहळ्ळी   हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या एका टोकाला आहे . गुवाहाटी सारखी नसली तरी इथेही तसेच सृष्टी सौन्दर्य पाहायला मिळते .  डोंगराच्या रांगा आणि हिरवळीने नटलेल्या या निसर्गरम्य गावात यायच्या रस्त्याला मात्र गेल्या ५० वर्षात मुहूर्त न मिळाल्याने वैतागलेल्या या ग्रामस्थांनी आता आश्वासने  बास रास्ता नाही मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे . प्रत्येक निवडणुकीत आजवर केवळ आश्वासने मिळाली मात्र रस्त्यावर कधी डांबर न पडल्याने गावात ना एसटी येते ना शाळा आहे ना दवाखाना . अशा स्थितीत शहाजीबापू तुमच्या मतदारसंघातील आमच्या गावात देखील डोंगार हाय , झाडी हाय पण रास्ता नसल्याने काहीच ओके नसल्याचे गावातील तरुण बोलू लागले आहेत . बापू आता तुम्हाला इकडे लक्ष द्यावेच लागेल अशी आग्रहाची मागणी देखील ग्रामस्थ करीत आहेत . रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या जवळ असणाऱ्या या गावातील हा रास्ता ४० वर्षांपूर्वी दुष्काळी जनतेला काम देण्यासाठी केला होता . आता या रस्त्याची अवस्था अतिशय भयानक झाली असून गावातील ओढ्याचे पाण्यातून ग्रामस्थांना वाट काढत जावे लागते . गावातील अनेकांचे इथे प्रघात झाल्याने दवाखान्याला देखील दुसऱ्या गावात जावे लागत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत . आता शहाजीबापू यांनी मनावर घेऊन हा रस्ता केला तर यंदा मतदान नाहीतर गावातून मतपेट्या रिकाम्या जातील असा इशारा द्यायलाही ग्रामस्थ विसरलेले नाहीत . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram