PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी, Sharad Pawar सोलापूरमध्ये, वातावरण तापणार?
Continues below advertisement
PM Narendra Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी, Sharad Pawar सोलापूरमध्ये, वातावरण तापणार?
सोलापूरकरांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील कुंभारी इथे साकारलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील १५ हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. तर सांगोल्यात दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घटनाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. देशाच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते आज सोलापुरात असल्यामुळे इथलं राजकीय वातावरण तापणार आहे.
Continues below advertisement