Pandharpur : विठ्ठल-रुक्मिणीची विश्रांती बंद, देवाचा पलंग काढल्यानंतर मिळणार 24 तास दर्शन
आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये आज सकाळी 11 वाजता देवाचा पलंग काढण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून देवाचे राजोपचार बंद होणार असून भाविकांसाठी २४ तास विठूमाउलीचं दर्शन घेण्याची व्यवस्था होणार आहे. विठ्ठल रुक्मिणीचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. या सर्वांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते, अशी प्रथा आहे.