ABP News

Pandharpur Vitthal Mandir Murti : विठ्ठल मंदिरातील गुप्त खोलीत सापडल्या विठ्ठल, व्यंकटेशाच्या मूर्ती

Continues below advertisement

विठ्ठल मंदिरातील गुप्त खोलीत सापडल्या विठ्ठल, व्यंकटेशाच्या मूर्ती

Pandharpur Vitthal Mandir : पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या (Pandharpur Vitthal Mandir) संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. मंदिरातील हनुमान गेटजवळ एक गुप्त खोली सापडली (Secret room foun) आहे. त्यामध्ये पुरातन मुर्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काल रात्री 2 वाजता ही गुप्त खोली आढळून आली आहे. दरम्यान, आज मंदिर समितीसह अध्यक्ष औसेकर आणि पुरातत्व विभागाची टीम पाहणी करणार आहे. 

आज रात्री पुरातत्व विभागाची टीम गुप्त खोलीची पाहणी करणार 

सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ एक गुप्त खोली आढळून आली आहे. ही खोली सहा फूट खोल आणि सहा फूट रुंद अशा आकाराची आहे. यामध्ये आत मूर्तीसदृश्य वस्तू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आज रात्री पुरातत्व विभागाची टीम आत उतरणार आहे. या खोलीत नेमकं काय आहे ह पाहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram