Pandharpur : मंगळवेढा तालुक्यात तिहेरी हत्याकांड, शेत बांधाच्या वादातून दगडाने ठेचून तिघांना संपवलं
abp majha web team
Updated at:
22 Feb 2023 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तिहेरी हत्याकांड घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे . नंदेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक महादेव माळी यांच्या दोन बहिणी आणि सुनेची अज्ञात कारणाने दगडाने ठेचून हत्या झाल्याचे समोर आले आहे . महादेव माळी यांच्या मातोश्रीचे निधन काही दिवसापूर्वी झाले होते . यासाठी माली यांच्या दोन विवाहित बहिणी शेतातील वस्तीवर राहण्यासाठी आल्या होत्या . दरम्यान महादेव माली हे गावातील हॉटेलकडे तर त्यांच्या मुलगा बंडू हा त्याच्या कापड दुकानाकडे गेल्यावर दुपारी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.