Pandharpur: कार्तिकी एकादशीला पंढरपुरात महापूजा कोण करणार? पंढरपूर मंदिर समितीची आज दुपारी बैठक

Continues below advertisement

पंढरपूरात कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मंदिर समितीची बैठक होत असून यंदा कार्तिकीची महापूजा कोण करणार हा पेच मंदिर समिती समोर कायम आहे . राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करायचं की अजित पवारांना हा पेच समितीसमोर आल्यावर त्यांनी थेट याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे यासाठी मार्गदर्शन मागवले होते. शासनाने अद्याप तरी याबाबत कोणताही निर्णय न दिल्याने कार्तिकी महापूजेला नेमकं कोणाला निमंत्रण द्यायचं याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे... 
यातच पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही मंत्री , आमदार, खासदारांना महापूजेसाठी बोलावू नये
अन्यथा नेत्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा मराठा समाजाने दिलाय.. त्यामुळे मंदिर समितीच्या अडचणीत वाढ झालीये. दरम्यान मंदिर समितीच्या आजच्या बैठकीकडे सकल मराठा समाजाचेही लक्ष आहे .   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram