Pandharpur : वारकऱ्यांची चंद्रभागेच्या तीरी स्नानासाठी गर्दी, उजणीतून पाणी बंद केल्याने सुरक्षीत स्नान
Pandharpur : कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागेतिरी स्नानासाठी गर्दी केलीय. एबीपी माझाच्या बातमीनंतर वारकऱ्यांचं हे स्नान आता सुरक्षित झालं आहे. काही दिवसांपूर्वी उजनीतून पाणी सोडल्यानं चंद्रभागेची पाणीपातळी वाढली होती. एबीपी माझाने याबाबत वृत्त दाखवल्यानं उजणीतून येणारं पाणी बंद करण्यात आलं. त्यामुळे चंद्रभागेची पाणीपातळी पुन्हा खाली गेली आणि भाविकांना स्नान करणं सुरक्षित झालंय.