Pandharpur Karitiki Yatra : कार्तिकी एकादशीसाठी पंढरपुरात लाखो भाविकांची गर्दी
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रात्री १२ वाजता विठूरायाच्या नित्यपूजेला सुरुवात होईल. त्यानंतर देवाची पाद्यपूजा होईल. पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरुवात होईल. आधी विठूरायाची आणि मग रुक्मिणीमातेची पूजा होईल. पहाटे साडेतीनच्या सुमारास मंदिर समितीच्या वतीनं फडणवीस दाम्पत्याचा सन्मान करण्यात येईल. पहाटे चारच्या सुमारास राज्यभरातून आलेल्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात येईल.