Pandharpur Handicap Darshan : व्हील चेअर नेण्यात अडचणी, पंढरपूर मंदिरात अंपंगांनी दर्शन कसं घ्यायचं?

Pandharpur Handicap Darshan : व्हील चेअर नेण्यात अडचणी, पंढरपूर मंदिरात अंपंगांनी दर्शन कसं घ्यायचं?

पंढरपूरचं विठ्ठल मंदिर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचंच आराध्य दैवत. लाडक्या विठूरायाचं मुखदर्शन घेण्यासाठी वर्षभर इथं भाविकांची रिघ लागलेली असते. असं असूनही व्हीलचेअर गाभाऱ्यापर्यंत नेण्याची सुविधा नसल्याने दिव्यांग भाविकांची गैरसोय होते.
नागपूरचं एक कुटुंब विठ्ठल मंदिरात आलं होतं. कुटुंबातील आजी व्हीलचेअरवर आहेत, त्यांना दर्शन घ्यायचं होतं.. व्हीलचेअर गाभापर्यंत नेताना कुटुंबाला बराच त्रास झाला. मंदिर संमितीकडे निधीची कमी नाही.. कमी आहे ती फक्त इच्छासक्तीची. म्हणून विठ्ठल मंदिरात लवकरात लवकरात लवकर रॅम्प व्हावा, अशी मागणी भक्तांसह एबीपी माझा देखील करत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola