Bhagirath Bhalke : पंढरपुरात राष्ट्रवादीला धक्का, भगीरथ भालके बीआरएसमध्ये जाणार?

निवडणुकीचे पडघम वाजण्यास अजून बराच कालावधी आहे.. यानिमित्त बीआरएसने महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीय.. बीआरच्या हाती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा उमेदवार लागल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.. भगीरथ भालके यांना नेण्यासाठी खास विमान सोलापुरात दाखल झालंय.. भालके हैद्राबादकडे रवाना होणार आहेत. आज सायंकाळी चंद्रशेखर राव यांच्या बैठकीनंतर भालकेंच्या पक्षप्रवेशाबाबत चित्र स्पष्ट होणार आहे... भगीरथ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत देखील भेट झाली होती.. दरम्यान भालकेंना आपल्या गोटात घेण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी संपर्क साधत भेटीचे निमंत्रण दिलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola