Narsayya Adam Speech Solapur : फडणवीसांऐवजी उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री उल्लेख, आडम मास्तरांचं भाषण

Continues below advertisement

Narsayya Adam Speech Solapur : फडणवीसांऐवजी उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री उल्लेख, आडम मास्तरांचं भाषण

PM Narendra Modi Solapur Visit Today : पतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलतांना आपल्या भाषणात माकप नेते व माजी आमदार आडम मास्तर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. मात्र, आपली चुकी लक्षात येताच त्यांनी त्यात दुरुस्ती केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मोदी सभास्थळी दाखल झाले असून, कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. त्यावेळी मंचावर आडम मास्तर बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र, आडम मास्तरांनी पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करताना आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेताना चुकून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. आडम मास्तरांनी चूक लक्षात येताच तात्काळ माफी मागितली आणि चूक सुधारली. मात्र, त्यांच्या या वाक्याची सभास्थळी जोरदार चर्चा पाहायला मिळाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram