Pandharpur : माघी यात्रेसाठी चार लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात, प्रत्येकासाठी नाश्ता-भोजनची सोय
माघी सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक शहरात दाखल झाले असताना चंद्रभागेच्या तिर भाविकांच्या महासागराच्या फुलून गेले आहे . मात्र या माघी सोहळ्यावर दुष्काळाचे सावट असल्याने भाविकांना केवळ घोटाभर पाण्यात माघीचे पवित्र स्नान करावे लागत आहे . सध्या उजनी धरणात वजा १५ टक्के पर्यंत पाणी पातळी खालावल्याने धरणातून चंद्रभागेत पाणी सोडणे शक्य नाही . आता धरणात राहिलेले पाणी हे केवळ पिण्यासाठी राखून ठेवावे लागणार असल्याने पुन्हा भाविकांसाठी चंद्रभागेत पाणी सोडणे अशक्य आहे . याचाच फटका या सोहळ्यासाठी आलेल्या वारकर्यांना बसत असून केवळ घोटाभर पाण्यात स्नानाचा आनंद घ्यावा लागत आहे . असे असले तरी भाविक चंद्रभागेत स्नान करून किंवा पाय धुवून वाळवंटात भजन आणि कीर्तनाचा आनंद घेत आहेत . उद्या माघी एकादशीचा सोहळा होत असून चंद्रभागेत कमी पाणी असले तरी भाविकांच्या मध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे .