Kiran Lohar :शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचाराचं कुरण,कामांची मंजुरी, बदली,मान्यतेसाठी लाखो रुपयांची मागणी
सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना अटक केल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आलाय. लोहार यांच्या अटकेनंतर शिक्षकांनी शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचं दरपत्रकंच समोर आणलंय. कामं मंजुरी करण्यापासून ते बदली आणि मान्यतेसाठी लाखो रुपये उकळले जातात अशी माहिती शिक्षकांनी माझाला दिलीय.... शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला भ्रष्टाचारानं कसं पोखरलं आहे याचं उदाहरण सोलापूरच्या घटनेमुळे समोर आलंय. शिक्षणक्षेत्राचे असे वाभाडे निघत असताना शिक्षणमंत्री आता कोणती भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे...