Solapur | अपंग झाल्यावर खचले नाहीत, गॅरेजवर काम करत स्वावलंबी जीवन जगणारे आरिफ मुल्ला | सोलापूर | ABP Majha
छोट्या मोठ्या कारणावरून जीव देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. मात्र सोलापुरातील रफिक मुल्ला या अवलीयाची कहाणी जरा वेगळी आहे. लहानपणी रफिक यांना अपंगत्व आलं मात्र ते खचले नाहीत. चालण्यासाठी जरी कुबड्यांचा आधार घ्यावा लागला तरी जगण्यासाठी कोणाचा ही आधार न घेता रफिक स्वावलंबी जीवन जगतयात. रस्त्यावर गॅरेज काम करत रफिक गेली 22 वर्ष संसाराचा गाडा हाकतात. त्यांच्या कामातला प्रामाणिक पणा पाहत आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंडळी आवर्जून रफिक यांच्या कडेच गाडी दुरुस्ती साठी येतात.