Pandharpur : उजनी, वीर धरणातून विसर्ग सुरू, चंद्रभागेत उतरू नका; प्रशासनाचं आवाहन
उजनी धरणातून भीमा नदीत 60 हजार क्युसेक वेगानं तर वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरु आहे.. त्यामुळं पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका निर्माण झालाय.. पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या उजव्या काठावर 13 तर डाव्या तीरावर 28 गावे आहेत . सरकवली , पटवर्धन कुरोली , उंबरे पागे सारख्या ग्रामीण पट्ट्यात पाणी शिरण्यास सुुरुवात झाली आहे.. सध्या प्रशासनाने शहरात 2 बोटी आणि कोळी बांधवांच्या होड्या सज्ज ठेवल्या असून कोणत्याही भाविकाला चंद्रभागा पात्रात न जाण्याचे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे..