Solapur Nursery : सोलापुरात पाऊस नसल्याने नर्सरी चालकांचं मोठं नुकसान, 10 ते 20 हजार रोपं शिल्लक
Continues below advertisement
सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने नर्सरी चालकांचं मोठे नुकसान झालंय.. बार्शीच्या वाणेवाडी येथील सचिन लोखंडे यांनी ५ वर्षांपूर्वी रोपवाटिका सुरु केलीय.. यंदाच्या वर्षी या रोपवाटिकेत जवळपास 70 ते 80 हजार रोपं होती. मात्र, पाऊस नसल्याने आता केवळ 10 ते 20 हजार रोपं शिल्लक राहिली आहेत. पावसाने पाठ फिरविल्यानं आंबा, सीताफळ, जांभूळ, लिंबू, पेरू अशी अनेक रोपं अक्षरशः उध्वस्त झाली आहेत. दरवर्षी वर्षी वीस ते पंचवीस लाखांचे उत्पन्न रोपवाटिकेतून मिळतं, यंदाच्या वर्षी मात्र रोपांचा खर्चही निघणं अवघड झालंय.. रोपवाटिका जगवण्यासाठी काही दिवस टँकरने पाणीपुरवठा केला. मात्र, आता तो खर्च देखील निघणं कठीण झालंय.
Continues below advertisement