Chandan Uti Sohala Pandharpur : विठूरायाच्या चंदन उटी पूजनाची सांगता; सोन्याचे दागिने अर्पण

Continues below advertisement

Chandan Uti Sohala Pandharpur : विठूरायाच्या चंदन उटी पूजनाची सांगता; सोन्याचे दागिने अर्पण ग्रीष्मऋतूतील वाढत्या अश्म्यापासून  श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मातेला रोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाहि  ९ एप्रिल पासून देवाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात झाली होती . आज मृग नक्षत्राच्या आगमनानंतर परंपरेनुसार या चंदन उटी पूजेची सांगता करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली .   श्रीविठ्ठलाला उन्हाचा दाह जाणवू नये  , त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यात येते. श्री विठ्ठलाच्या चंदनउटीपुजेसाठी २१ हजार व रूक्मिणीमातेच्या पुजेसाठी ९ हजार इतके देणगी मुल्य आकारण्यात येते.   श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने दिनांक १५ मार्च ते १ जून पर्यंत पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे ५ ते सकाळी ११ पर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यामुळे या कालावधीतील चंदन उटी पुजा भाविकांना उपलब्ध करून न देता मंदिर समिती मार्फत करण्यात आल्या होत्या. पुन्हा २  जून रोजी पदस्पर्शदर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांना चंदनउटी पुजा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये विठ्ठलाकडे १८ व रूक्मिणीमातेकडे १२ भाविकांना पुजेचा लाभ मिळाला असून, यामधून मंदिर समितीला ४ लाख ८६ हजार इतके उत्पन्न मिळाले आहे. आज मंदिर समितीच्या वतीने श्रींची चंदनउटीपूजा करून या पूजेची सांगता करण्यात आली.   पुण्यातील  महिला भक्ताकडून विठुरायाच्या चरणी सोन्याचे दागिने अर्पण    राज्यातील सर्वांस,अन्य भावींच्या कडून सध्या सातत्याने विठुरायाच्या चरणी मौल्यवान दागिने अर्पण करण्यात येत आहेत . पुणे येथील भाविक  सौ. स्नेहलता हेमंत शिंदे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस ५९ ग्रॅम वजनाचे एक गंठण आणि एक सोन्याची चेन अर्पण केली .  त्याची किंमत ३७७००० रुपये  इतकी आहे.       यावेळी मंदिर समितीच्या वतीने सौ.शिंदे यांचा सत्कार मंदिर समितीचे  विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन  सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram