Pandharpur Vitthal Mandir Jewellary : विठुरायाला अर्पण झालेले पोतेभर दागिने खोटे, तपासणीत उघडकीस

Continues below advertisement

 पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या खजिन्यात खऱ्या चोख दागिन्यांसोबत असे पोतेभरुन खोटे दागिने देखील जमा झाले आहेत. गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या विठुराच्या चरणी भाविक सढळ हस्ते मोठ्या संख्येने दान करत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांसह दागदागिन्यांचाही समावेश असतो. मात्र आता विठ्ठलाला दान करण्यात आलेले दागिनेच नकली निघाल्याचे समोर आले आहे. देवाची दान पेटी मोजताना यात अनेक प्रकारचे दागिने आढळतात.  या दागिन्यांना सराफाकडून तपासून घेतले जाते. यातील खरे असणारे दागिने व्यवस्थीत बाजूला ठेवले जातात. यात अनेक दागिने सोन्या चांदी सारखे दिसणारे पण त्याला पॉलिश केलेले किंवा बेंटेक्स प्रकारचे आढळले आहेत. अशा नकली दागिन्यांची संख्या एक पोते भरेल इतकी झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram