Akash Kandil Making Solapur : पणत्या आणि मातीचे आकाश कंदील बनतात कसे? Diwali 2022
दिपावली अर्थात प्रकाशाचा सण. प्रकाशाचा हा उत्सव अगदी दोन दिवसांवर आलाय. त्यामुळे बाजार सजलेत. प्रत्येकाच्या घरासमोर दिव्यांचा लखलखाट असावा यासाठी सोलापुरात कुंभार बांधवानी विविध प्रकराच्या पणत्या, दिवे, मातीचे आकाश कंदील तयार केलेत. सोलापुरातल्या सात रस्ता परिसरात दरवर्षी हे साहित्य कुंभार बांधव विक्री करत असतात. मात्र यंदा ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाहीये. त्यामुळे व्यापारी बांधव ग्राहकांची प्रतिक्षेत आहेत. दीपावलीनिमित्त शहरात दरवर्षी लाखो पणत्या तयार केल्या जातात. सोलापुरात तयार होणाऱ्या या मातीच्या पणत्यांना आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातून देखील मोठी मागणी असते. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मातीच्या चाकाऐवजी आता इलेक्ट्रिक मशीनवर या पणत्या तयार केल्या जात आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पणत्यांची निर्मितीदेखील होतेय. ग्राहकांचा कल पाहता यंदा मातीचे आकाश कंदील देखील बाजारात दाखल झालेत. या पणत्या आणि मातीचे आकाश कंदील बनतात कसे, बाजारत नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिध आफताब शेख यांनी