Solapur : राष्ट्रवादीच्या नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप, अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक
Continues below advertisement
सोलापुरातील अंतर्गत वादाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे... तीन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका महिलेनं माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यासोबतच जिल्ह्यात पक्षातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत... महिला जिल्हाध्यक्षांच्या गच्छंतीप्रकरणही चांगलंच गाजलं होतं.. मात्र अशा घटनांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्यानं आता पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत... या प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई करणार, तसंच पक्षातील अंतर्गत वादावरही खलबतं होण्याचा अंदाज आहे.
Continues below advertisement