Smartphone : स्मार्टफोन्समुळे मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम ABP MAJHA

Continues below advertisement

ऑनलाईन शाळा किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात स्मार्टफोन्स देत असाल तर ही बातमी लक्ष देऊन पाहा..  स्मार्टफोन्सच्या अतीवापरामुळे लहान मुलांच्या एकाग्रतेवर गंभीर परिणाम होत असल्याचं राष्ट्रीय बालहक्क आयोगानं केलेल्या एका अभ्यासातून समोर आलंय. देशातील जवळपास २४ टक्के मुलं झोपण्यापूर्वी स्मार्टफोन्स वापरतात, वयानुसार हे प्रमाण वाढत जातं आणि याचा गंभीर परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचं आयोगाच्या अभ्यासात नोंदवण्यात आलंय. लॉकडाऊनमध्ये लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञ आधीच सांगत आहेत. मात्र आता या नव्या अभ्यासातून यावर शिक्कामोर्तब झालंय.  देशातील ३७.१५ टक्के मुलांमध्ये स्मार्टफोन्सच्या अतीवापरानं एकाग्रता कमी झाल्याचं या अभ्यासातून समोर आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram